मोर - तहान पावसाची !





मोर - तहान पावसाची !

तापलेल्या धारेला असते तहान पावसाची,
सूर्याच्या प्रखर तेजा पासून स्वतःला वाचवायची....

हि धरा, रुक्ष - वाळवंट - ओसाड अशी,
पर्जन्याच्या वाटेवर डोळे लावून जशी....

हा मयूर हि केकारव करी,
पावसाला प्रेमाने हाक मारी....

भिजुनी जाऊदे - धारा ही, मयूर ही,
थेंबांना झेलून ही, कवळून ही .....

सहन न होई हा उष्माघात,
थुई थुई नाचावेसे वाटे आता पावसात....

धरा ही आता होउदे हिरवीगार,
झेलली आहेत तिने उन्हे फार....

तृप्त होऊन शांत झाली धरा आज,
लेऊन सजली नवा साज.....

मनाचा मोर ही खुलतो या वेड्या पावसात,
पिसारा फुलवून धरतो ठेका, मनातल्या मनात!


                                                                                      जुई.

Comments

  1. Mor sound is keka.Kekarav.
    New words.used.छान कविता.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Perfect family is a myth.

Which diagonal lane?

Longing for December!