घर असावे घरा सारखे !

घर असावे घरा सारखे !

घर हे माझे नि तुझे,
एक एक काडी जमवून विणले  जसे .....

भांडणे - चिडणे - रडणे, परतुनी प्रेमात पडणे,
अशी घट्ट वीण विणणे, जन्म भर घरा साठी झटणे......

चार चौघांच्या घरा सारखेच घर हें आमचे,
स्वागत होईल येथे सदैव तुमचे......

ऊब प्रेमाची, आदराची घरास या,
जिवा भावाची माणसे येथे लावी माया.....

खारीचा वाटा मुलांचा हि यात,
दंगा मस्ती हास्याने शोभा वाढवतात.....

घर असावे घरा सारखे - म्हणतो ना आपण,
माणसांनी - नात्यांनीच घराला येते घरपण!


                                                                                                     जुई.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Perfect family is a myth.

Which diagonal lane?

Longing for December!