हि वाट दूर जाते !!
हि वाट दूर जाते !!
दूर दूर क्षितिजा पार,
चल सख्या जाऊ,
हातात हात घालुनिया
एकत्र घालवू क्षण चार...
मनातले काही मी बोलीन ,
काही तू बोल,
आज या वाटेवर,
शब्दात तुझ्या भिजून मी जाईन...
वाटेवर सुख-दुःखाच्या गप्पा मारू,
वेळ जाऊ विसरुनिया,
सावलीत जरा घेऊ क्षणभर विश्रांती,
हिरवा गार दिसल्यास तरु...
लाभला हा एकांत
बऱ्याच दिवसात,
आसमंत हि शांत...
हि वाट नेई दूर कुठेतरी ,
स्वप्नातल्या एका गावा परी,
तेथेच रमू , थोडा वेळ,
भान नको - ना काळ वेळ...
मग येऊ परत,
आपल्या जगात,
असेच पुन्हा जाण्यास स्वप्नातल्या राज्यात,
नेईल जिथे हि वाट........
जुई.
दूर दूर क्षितिजा पार,
चल सख्या जाऊ,
हातात हात घालुनिया
एकत्र घालवू क्षण चार...
मनातले काही मी बोलीन ,
काही तू बोल,
आज या वाटेवर,
शब्दात तुझ्या भिजून मी जाईन...
वाटेवर सुख-दुःखाच्या गप्पा मारू,
वेळ जाऊ विसरुनिया,
सावलीत जरा घेऊ क्षणभर विश्रांती,
हिरवा गार दिसल्यास तरु...
लाभला हा एकांत
बऱ्याच दिवसात,
आसमंत हि शांत...
हि वाट नेई दूर कुठेतरी ,
स्वप्नातल्या एका गावा परी,
तेथेच रमू , थोडा वेळ,
भान नको - ना काळ वेळ...
मग येऊ परत,
आपल्या जगात,
असेच पुन्हा जाण्यास स्वप्नातल्या राज्यात,
नेईल जिथे हि वाट........
जुई.
Wow Jui..it's really very good!
ReplyDeleteThnku dear😇
ReplyDeleteछान आहे कविता
ReplyDelete. उषा
Dhanyawad🙏
Deleteछान आहे कविता.उषा.
ReplyDelete