Posts

Showing posts from July, 2021

लेक माझा!

  प्रिय निषू.... इवलासा तू जेव्हा, माझ्या हातात आलास, क्षण भर घाबरले रे मी.... आई होणं नेमकं कसं असतं, क्षण भर गोंधळले रे मी! तूला निरखून पाहण्यात, नंतर, तासंतास जाई माझा.... मन भरायचंच नाही, कितीही चेहरा पाहून तुझा! पालथा पडलास चटकन, होतास खूप चपळ तू.... सरकत, रांगत, बसत, बघता बघता, उभाही राहिलास तू! तूझं दूडू- दूडू चालणं, तूझं मन मोकाट पळणं.... अजून सर्व काही डोळ्या समोर आहे, तुझ्या खाणा खूणा, बोबडे शब्द, मनात सगळं ताजं आहे! माझ्याच उंचीचा झालास आता, घरात सगळी मदत करतोस .... गेम्स खेळण्यात विषेश आवड, एक प्रेमळ भाऊ, म्हणून ही वावरतोस! तुझ्या बद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे, माझा मोठा गुणी लेक, म्हणून मला तुझा अभिमान आहे!           आई.